पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा देशभरात प्रसिद्ध झाला. या प्रसंगी देशभरात अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच मोदींनी आजच्या कार्यक्रमात ‘मन की बात’चा प्रवास सांगितला. तसेच ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अभियानाच्या यशावरही भाष्य केले.
शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्रं वाचून माझं मन भावूक झालं. हा कार्यक्रम देशातील चांगल्या गोष्टींचा आणि सकारात्मकतेचा अनोखा पर्व बनला आहे. हा कार्यक्रम दर महिन्याला येतो. या कार्यक्रमाचा सर्वांना प्रतीक्षा असते, असंही मोदी म्हणाले.मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझं अभिनंदन केलं, पण खरे अभिनंदनाचे पात्र मन की बातचे श्रोते आहेत. पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, मला तुमच्या सर्वांची हजारो पत्रं आली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्रं वाचण्याचा प्रयत्न केला.