Goregaon Rain Accident : मुंबईत पावसामुळे आणखी एक बळी! प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कारभाराची पोलखोल

मुंबईत आतापर्यंत 3 ते 4 अशा दुर्घटना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Goregaon Rain Accident : मुंबईत पावसामुळे आणखी एक बळी! प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कारभाराची पोलखोल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेले दोन दिवस मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, पालिका आणि राज्यसरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे. अशातच मुंबईत मागील काही दिवस पाऊस सुरु झाल्यापासून अघातांचे सत्रही सुरू झाले आहे. मुंबईतच आतापर्यंत 3 ते 4 अशा दुर्घटना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच आज दिवसभरात तिसरी झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. ज्यात हसन रजा जहांगीर आलम सय्यद या 18 वर्षीय तरूणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- Mumbai Rain Accident : मुंबईत पावसाचा जोर कायम असताना दुर्घटनांचे सत्रही सुरू; कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाड आणि फांद्या कोसळल्याने मुंबईत एकाच दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने संपूर्ण शहरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. मृत तरुण हा मुंबईच्या साकीनाका परिसरातील रहिवासी असून हसन आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13 च्या रस्त्यावरून जात होता. मात्र त्यावेळेस मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला असताना एका झाडाची मोठी आणि जड फांदी थेट हसनच्या डोक्यावर कोसळली. ज्यात तो गंभीर जखमी झाला, आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. 

यानंतर स्थानिक नागरिक आणि मित्रांच्या मदतीने त्याला तातडीने मलाड पूर्व येथील बाळाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. दरम्यान या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. याचदरम्यान मुंबईतील बांद्रा, कुर्ला, अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर आता तीव्र टीका होत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आव्हान करण्यात आले मात्र आज रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक पर्यटक कुटुंबीयांसोबत मरीन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्यावर पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेसाठी 100 मीटर अंतरावर मुंबई पोलिस तैनात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number