Amrawati Crime : मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं! चिकन खाण्याचा वाद पोहोचला टोकाला, 12 वर्षाच्या लेकाच्या मृत्यूची खोटी तक्रार आणि…, नेमकं घडलं काय?

अपघाताची खोटी तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा उलगडा केला.

Amrawati Crime : मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं! चिकन खाण्याचा वाद पोहोचला टोकाला, 12 वर्षाच्या लेकाच्या मृत्यूची खोटी तक्रार आणि…, नेमकं घडलं काय?

अमरावतीच्या भातकुली येथे चिकन खाण्याच्या वादातून मावस भावानेच  आपल्या 12 वर्षीय भावाची लोखंडी वस्तूने वार करत घरातच त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे, सुरुवातीला अपघाताचा बनाव करून अपघाताची खोटी तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा उलगडा केला.

जितेराजा गौड वय 12 वर्ष असे मृतक बालकाचे नाव आहे, तर बब्बू गौड वय वर्ष 21 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी हे मध्यप्रदेशचे असून ते कामासाठी भातकुली तालुक्यात आले होते, मृतक मुलाच्या वडिलांनी अपघाताची खोटी तक्रार दिली असल्याने त्यांना सुद्धा यात आरोपी करण्यात आले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number