अमरावतीचा अभिमान..न्यायमूर्ती भूषण गवई ठरणार भारताचे 52वे सरन्यायाधीश, 14 मे रोजी शपथविधी

न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ही शपथ दिली जाणार आहे.

अमरावतीचा अभिमान..न्यायमूर्ती भूषण गवई ठरणार भारताचे 52वे सरन्यायाधीश, 14 मे रोजी शपथविधी

अमरावती: देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर अमरावतीचा सुपुत्र विराजमान होणार असून, न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ही शपथ दिली जाणार आहे. या ऐतिहासिक घडामोडीनं अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. प्रतिभा पाटील यांच्यानंतर अशा सर्वोच्च पदावर पोहोचलेले भूषण गवई हे दुसरे अमरावतीकर ठरणार आहेत.सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला असून ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी खासदार व राज्यपाल रा.सु. गवई आणि कमलताई गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी अमरावतीतील फ्रेजरपुरा भागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 5 मध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचे बालपण काँग्रेस नगर परिसरात गेले. शिक्षणात लहानपणापासूनच हुशार असलेल्या गवई यांनी मुंबईतून कायद्याची पदवी घेत 1985 मध्ये वकिलीची सुरुवात केली. मुंबई व अमरावती येथे त्यांनी यशस्वी वकिली करत, नंतर नागपूर खंडपीठात न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

24 मे 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार असून, सहा महिन्यांचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या काकांनी आनंद व्यक्त करत म्हटलं की, 'भूषण लहानपणापासूनच अभ्यासात कुशाग्र होता, आणि आज तो सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होतोय, याचा आम्हाला अभिमान आहे.' अमरावती शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घडामोडीमुळे आनंदाचे वातावरण आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number