Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात! राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची धडक; दोन युवतींचा जागीच मृत्यू

अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन युवतींचा जागीच मृत्यू झाला. कामानिमित्त शहरात आलेल्या दोघींच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात! राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची धडक; दोन युवतींचा जागीच मृत्यू

अमरावती: अमरावती शहरात मंगळवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने दोन युवतींना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत युवतींची ओळख गौरी प्रमोद धर्माळे आणि हर्षा आदेश गावंडे अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघीही बाहेरगावच्या असून कामानिमित्त अमरावती शहरात आल्या होत्या. आपल्या कामासाठी शहरात आलेल्या या दोघींवर अचानक काळाने झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: Mumbai ABC Action : टो केलेली कार सोडण्यासाठी केली 10 हजारांची मागणी; ACB नं रचला सापळा, दोघांना घातल्या बेड्या

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजापेठ उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव ट्रकने दोघींना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच राजापेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तसेच अपघात कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाची निष्काळजीपणा कारणीभूत होता का, या सर्व बाबींचा तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा:Crime News: क्रूरतेची परिसीमा! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं; पतीने सासू-सासऱ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला लेकीचा करुण अंत

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सकाळच्या वेळेत घडलेल्या या अपघातामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत उड्डाणपुलावर भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर वेगमर्यादेचे काटेकोर पालन आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number