Amravati News: अमरावतीत आई-वडिलांचा प्रताप, स्वत:च्याच 16 वर्षीय लेकीचं केलं मुंडण आणि..; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अमरावती जिल्ह्यात पालकांनी 16 वर्षीय मुलीचे केस कापून मारहाण करत तिला घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Amravati News:  अमरावतीत आई-वडिलांचा प्रताप, स्वत:च्याच 16 वर्षीय लेकीचं केलं मुंडण आणि..; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अमरावती: जन्मदाते आई-वडील हे मुलांचे पहिले रक्षक मानले जातात. मात्र, पालकांच्या काळजीचे रूपांतर जेव्हा बुरसटलेल्या मानसिकतेत आणि क्रूरतेत होते, तेव्हा नात्यांचाच श्वास कोंडतो. असाच एक अत्यंत संतापजनक आणि तितकाच सुन्न करणारा प्रकार अमरावती जिल्ह्यातून समोर आला आहे. केवळ ‘मुलगी सुंदर दिसते आणि तिच्या लांबसडक केसांमुळे मुले तिच्याकडे आकर्षित होतात’, या समजुतीतून जन्मदात्यांनीच त्यांच्या 16 वर्षीय पोटच्या मुलीच्या केसांचे ट्रिमरने मुंडण करत तिला घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी सध्या शिक्षण घेत आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या मुलीवर परिसरातील कोणाचीही वाईट नजर पडू नये, या तथाकथित काळजीतून आई-वडिलांनी क्रूरतेची परिसीमा गाठली. त्यांनी चक्क घरात ट्रिमर मशीन आणून मुलीचे संपूर्ण केस कापून टाकले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिला बेदम मारहाण केली आणि घराच्या चार भिंतींत डांबून ठेवले. पालकांच्या या अनपेक्षित आणि अमानुष वागण्याने अल्पवयीन मुलगी प्रचंड दहशतीखाली आली होती.

या भयानक कृत्यामागे आणखी एक गंभीर कारण दडलेले होते. एका तरुणाची त्यांच्या मुलीवर वाईट नजर असून तो तिचा पाठलाग करत असल्याचा संशय पालकांना होता. याच संशयाच्या आधारे त्यांनी मुलीवर त्या तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, मुलीने अशी कोणतीही तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला. मुलीच्या या नकाराचा पालकांच्या अहंकाराला आणि रागाला भयंकर धक्का बसला. त्याच रागाच्या भरात त्यांनी मुलीचे केस कापून तिचे विद्रुपीकरण करण्याचे हे टोकाचे पाऊल उचलले, ज्यातून त्यांची बुरसटलेली मानसिकता स्पष्टपणे दिसून येते.

हेही वाचा: Land And Property Rules: महिलेच्या निधनानंतर तिच्या संपत्तीवर खरा अधिकार कुणाचा? दावा फेटाळत उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निकाल

स्वतःच्याच घरात, स्वतःच्याच हक्काच्या माणसांकडून घडलेल्या या प्रसंगामुळे मुलगी हादरली असली, तरी तिने हिंमत हारली नाही. संधी मिळताच तिने थेट वरुड पोलीस ठाणे गाठले आणि तिच्या जन्मदात्यांविरुद्धच तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले आणि मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीसमोर आपली कैफियत मांडताना, “ज्यांनी माझा असा अमानुष छळ केला, त्या आई-वडिलांसोबत मला आता कोणत्याही परिस्थितीत राहायचे नाही,” अशी ठाम भूमिका या 16 वर्षीय मुलीने घेतली. तिची मानसिक अवस्था पाहता प्रशासनाने तिची रवानगी एका शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात केली आहे.

या प्रकरणी वरुड पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आई-वडिलांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता ज्या तरुणावरून हा सर्व वाद उफाळून आला, तो तरुण नेमका कोण आहे आणि तो खरोखरच तिचा पाठलाग करत होता का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पालकांनी हे कृत्य ‘काळजीपोटी’ केले असल्याचा दावा केला असला, तरी या घटनेने समाजातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा आणि स्त्रियांकडे पाहण्याच्या बुरसटलेल्या दृष्टिकोनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. समाजातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याऐवजी स्वतःच्याच मुलींना घरात डांबून त्यांना शिक्षा देण्याची ही प्रवृत्ती अत्यंत चिंताजनक आहे. 

हेही वाचा: Gold Rate Today: सोन्याच्या दरात अचानक वाढ! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आता इतके पैसे, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number