अमरावती जिल्ह्यातील परतवाडा मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर युवकाने तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात आरोप आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांकडे मिळाले आहे
मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या वीस वर्षे युवकाने अनेक तरुणींशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्याने या प्रकरणी आणखी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. हुजर खान इकबाल खान असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात फिर्यादी संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आरोपींवर दाखल गुन्ह्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होणार असल्याची शक्यता आहे. फिर्यादींनी पोलिसांना भेटून आपल्यावरील अत्याचाराची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद केले आहे. फिर्यादीची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी विशेष करून नमूद केले.