जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अमरावती शहराच्या कॅम्प परिसरात असलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उर्ध्व वर्धा धरण विभागातील रेकॉर्ड रूम ला आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचं तपास यंत्रणांकडून समोर आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प परिसरातील उर्ध्व वर्धा धरण विभागातील रेकॉर्ड रूम ला आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागली. तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलाला यासंदर्भात माहिती दिली मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे या आगीत कार्यालयातील सर्व महत्वाचे कागदपत्रे फाईल्स,लाकडी फर्निचर,कपाट जळून राख झाले होते. सकाळी ६ वाजता हि आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.
मात्र, या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कार्यालय फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे.
