जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती अमरावतीमध्ये दारु विक्रेत्यांकडून पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला आहे. इथल्या वडाली भागात अवैध दारु अड्डे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार या दारु अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस पथक गेलं असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दारु विक्रेत्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावतीमध्ये दारु विक्रेत्यांकडून पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला आहे. इथल्या वडाली भागात अवैध दारु अड्डे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
त्यानुसार या दारु अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस पथक गेलं असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दारु विक्रेत्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.