डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप. बॅंकेच्या अध्यक्षांची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती   डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप. बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.   वानखेडेंचा मृतदेह दिलीप ठाकरे यांच्या घरी मृत अवस्थेत आढळून आला आहे. दिलीप ठकरे हे त्यांचे जवळचे […]

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप. बॅंकेच्या अध्यक्षांची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप. बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

वानखेडेंचा मृतदेह दिलीप ठाकरे यांच्या घरी मृत अवस्थेत आढळून आला आहे. दिलीप ठकरे हे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. वानखेडे  गेल्या 10 वर्षांपासून पंजाबराव बॅंकेचे अध्यक्ष होते.

 

जिल्ह्यातील सरकार क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होते. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले.

 

याठिकाणी वानखेडे यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number