अमोल कोल्हेंचा ‘शो मस्ट गो ऑन’

मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात. सध्या ते ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहेत. दरम्यान अलीकडेच कराडमधील कल्याणी मैदानावर झालेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात […]

अमोल कोल्हेंचा ‘शो मस्ट गो ऑन’

मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात. सध्या ते ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहेत. दरम्यान अलीकडेच कराडमधील कल्याणी मैदानावर झालेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नुकतेच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या प्रकृतीचा तपशील दिला.

View this post on Instagram
A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

कराडमधील प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडल्याने कोल्हेंच्या पाठीला जोरदार धक्का बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पण या परिस्थितीतही त्यांनी प्रयोग सुरु ठेवला.

आता अमोल कोल्हेंनी समाज माध्यमांवर त्यांचा एक फोटो सामायिक केला आहे. या फोटोत अमोल कोल्हे हे रुग्णालयात दिसत आहेत. त्यांनी या फोटो खाली ,”काळजी करण्यासारखे काही नाही !!! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू ” 11 मे ते 16 मे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे “शिवपुत्र संभाजी” महानाट्य!” असे कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट पहिल्यांनंतर अनेक कलाकारांनी तसेच राजकीय व्यक्तींनी कंमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number