जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महानायक अमिताभ बच्चन यांना आता प्रसिद्धीपासून मुक्ती आणि शांती हवी आहे. बिग बीने स्वत: आपल्या ब्लॉगवर व्यक्त केलेल्या मनोगतात हे म्हटलंय. अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘या वयात मला प्रसिद्धीपासून मुक्ती आणि शांती हवी आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मी स्वत:सोबत एकटाच राहू इच्छितो. मला पदवी नकोय, मला त्याची घृणा वाटते. मी बातम्या शोधत नाही, मी त्यासाठी पात्र आहे असे समजत नाही, मला प्रशंसा नको, माझी ती योग्यता नाही.’ अमिताभ बच्चन यांच्यावर बोफोर्स घोटाळा, पनामा पेपर्ससंदर्भात आरोप झाले. त्यानंतर नुकतेच अवैध बांधकामावरुनही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेत. त्यानंतर अमिताभ यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय.