जय महाराष्टॅ न्युज, मुंबई
‘बनेगा स्वच्छ इंडीया’ चे ५ वे पर्व आजपासून सुरू होत आहे. एनडीटीवी – डेटॉल’बनेगा स्वच्छ इंडिया’ चे शेवटचे चार मोहिम यशस्वी झाले आहेत. आजपासून ही मोहीम पाचव्या हंगामात पोहोचली आहे.
बनेगा स्वच्छ इंडीयाचे ॲम्बॅसिटर बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून शौचालयाचा वापर करा तसेच कचऱ्यापासून खतनिर्मिती करा हे संदेश देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी उपस्थित शाळेतील मुलांशी अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला.स्वच्छ भारत मोर्चाच्या सुरुवातीपासून या दिशेने खूप प्रगती झाली आहे, परंतु आपल्याला अजून एक लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यासाठी तुम्हची सोबत अशीच असु द्या असंही अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले.