जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत. ठाणे स्थानकाबाहेर होणाऱ्या या सभेला अखेर पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठाणे स्टेशन परिसराची पाहणी केली.
दरम्यान या सभेतून राज ठाकरे फेरीवाल्यांसह विविध प्रश्नांवर भूमिका मांडणार आहेत. मनसेच्या फेरीवालाविरोधातल्या आंदोलनाची सुरूवात ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीर सभाही ठाण्यामध्येच होणार आहे.
तर महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभा घेतायंत त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.