अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा नागपूरचा दौरा रद्द झाला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा नागपूरचा दौरा रद्द झाला आहे. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. तसेच, या दौऱ्यात अमित […]

अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा नागपूरचा दौरा रद्द झाला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा नागपूरचा दौरा रद्द झाला आहे.

राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. तसेच, या दौऱ्यात अमित शाह भाजपा नेत्यांच्या भेटी घेणार होते. मात्र, अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे. दरम्यान, नागपुरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे या संस्थेचे मुख्य संरक्षक आहेत. तसेच या लोकापर्ण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारीच नागपुरात दाखल झाले होते.

यापूर्वी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार होतं. तसेच त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस खबरदारीदेखील घेण्यात आली होती. परंतु, प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे पंजाबमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहिर केला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी नागपूर दौरा रद्द केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number