जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
अमित शहा यांनी सपत्नीक मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे.
त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे अनेक नेतेही उपस्थित होते.
अमित शाह यांच्या मुंबईतील दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.