Pakistan Terrorism: आधी शाहिद लतीफ, आता अमीर हमजा… पाकिस्तानच्या भूमीवर भारतविरोधी दहशतवाद्यांची एकामागून एक ‘शिकार’! नेमकं काय घडलं?

टीव्ही चॅनलच्या कार्यालयाबाहेर झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Pakistan Terrorism: आधी शाहिद लतीफ, आता अमीर हमजा… पाकिस्तानच्या भूमीवर भारतविरोधी दहशतवाद्यांची एकामागून एक ‘शिकार’! नेमकं काय घडलं?

पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाचा सहसंस्थापक आणि भारतातील अनेक दहशतवादी कारवायांशी संबंधित अमीर हमजा याच्यावर गुरुवारी लाहोरमध्ये गोळीबार झाला. दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्याच्या कारवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अमीर हमजा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या एका वर्षातील त्याच्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

हा हल्ला लाहोरमधील एका टीव्ही चॅनलच्या कार्यालयाबाहेर झाला. अमीर हमजा एका चर्चासत्रात सहभागी झाल्यानंतर बाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्या वाहनाला लक्ष्य केले. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: Amravati Crime News : लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट, अयान-उझेरमध्ये मुली पटवण्यावरून शर्यत, पण अखेर….

अमीर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख विचारवंत मानला जातो. तो 2005 मधील बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेवरील हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी कारवायांशी जोडला गेला आहे. तो हाफिज सईद आणि जकी-उर-रहमान लखवी यांच्यासोबत लष्कर-ए-तैयबाच्या स्थापनेत सहभागी होता. सध्या तो या संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावशाली नेता मानला जातो.

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेक मोठ्या दहशतवाद्यांवर हल्ले झाले आहेत. 2025 मध्येही अमीर हमजा संशयास्पद परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाला होता.

याआधी शाहिद लतीफ, मुफ्ती कैसर फारूक, परमजीत सिंह पंजर आणि इतर अनेक दहशतवादी नेत्यांवरही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क आता पूर्वीसारखे सुरक्षित राहिलेले नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा: Virat Kohli: 'अनुष्का वहिनी बघताय ना…'; विराट कोहली पुन्हा सोशल मीडियावरील वादात अडकला; 'त्या' फोटोवरील एका 'लाईक'ने इंटरनेटवर खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number