जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
शिवरायांचा उल्लेख करून शिवीगाळ करणं अहमदनगरमधील भाजपच्या उपमहापौरांना चांगलच भोवल आहे.
नगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याची संतापजनक घटना समोर आलीय. तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप देखील सोशल मिडियावर व्हायरल झालेय.
श्रीपाद छिंदम यांच्या निवास्थानाची आणि कार्यालयाची काही संघटनाकडून तोडफोड करत संताप व्यक्त केलाय.
या सर्व प्रकारानंतर खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम यांचा राजीनामा घेत उपमहापौर पदावरुन हकालपट्टी केल्याची माहिती गांधी यांनी दिली.
व्हायरल झालेल्या क्लीपमधील संभाषण
कर्मचारी – हा बोला साहेब….
श्रीपाद छिंदम – माणसे आले नाही हे बरं आहे का ?
कर्मचारी – साहेब काल किन्नर तुमच्या बरोबर बोले ना ?
श्रीपाद छिंदम – माणस पाठवणार आहे की नाही ? तेवढं सांग
कर्मचारी – बर बर पाठवतो एवढी शिवजंयती फक्त होऊन द्या.
श्रीपाद छिंदम – तु काय शिवजीच्या xxx पैदा झासाय का ?
कर्मचारी – अहो साहेब सकाळी सकाळी जरा चांगल बोला, असं का बोलताय ?
श्रीपाद छिंदम – आम्ही काय मुर्ख आहे का ?
कर्मचारी – माणसे नाहीत म्हणून मी म्हणतोय एवढी शिवजयंती होऊन जाऊ द्या.
श्रीपाद छिंदम – माझ्या काय घरचं काम आहे का ते ?
कर्मचारी – माणसे नाही म्हटले ना साहेब, असं का बोलताल, नीट बोला ना साहेब.
श्रीपाद छिंदम – तु एक काम कर, तुला शिवजयंतीच्या एवढा पुळका आहे तर, चार माणसं पालिकेकडून वाढवून घे.