पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱ्या अमेरिकेची पाकिस्तानविरोधात आणखी एक धडक कारवाई

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. अमेरिकेने आज पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला असून त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील आदिवासीबहुल केंद्रशासित प्रदेशामधील दहशतवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा मोहरक्या एहसान […]

पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱ्या अमेरिकेची पाकिस्तानविरोधात आणखी एक धडक कारवाई

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. अमेरिकेने आज पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला असून त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

अमेरिकेने पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील आदिवासीबहुल केंद्रशासित प्रदेशामधील दहशतवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा मोहरक्या एहसान खावेरी याच्यासह आणखी तीन अतिरेक्यांचा ठार करण्यात आल्याचं अधिकृत वृत्त आहे.

या हल्ल्यात आणखीही अतिरेकी ठार झाल्याचं सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या हिंगू जिल्ह्याजवळ हा ड्रोन हल्ला करण्यात आला असून अमेरिकेने ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्रांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number