वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात डोकलाम परिसरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून भारताची स्तुती करण्यात आली आहे.
या संपूर्ण वादात भारत एखाद्या परिपक्व देशाप्रमाणे वागत आहे. या उलट चीनचे वर्तन हे लहान मुलासारखे असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताने आतापर्यंत योग्य निर्णय घेतले आहेत. त्यांनी आतापर्यंत या वादातून माघारही घेतलेली नाही किंवा चीनच्या आरोपांना उत्तर देण्याच्या फंदातही पडलेला नाही.
हे एखाद्या परिपक्व सत्तेचे लक्षण आहे. याउलट चीन रागाच्या भरात एखाद्या लहान मुलाप्रमाणे चुका करत असल्याचे अमेरिकन नौदल प्रशिक्षण महाविद्यालयातील
प्राध्यापक जेम्स होल्मस यांनी सांगितले.