जय़ महाराष्ट्र न्यूज, रायगड
रायगडमध्ये रुग्णवाहिकेला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ही घटना घडली आहे. शेडूंग टोल नाक्याजवळ या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला.
सुदैवाने रुग्णवाहिकेत कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
दरम्यान, गुरुवारी मुंबईत रुग्णाला घेवून जाणारी रुग्णवाहिका VIP ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
या प्रकारांमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.