Sindhudurg: मुसळधार पावसाचा फटका! महाराष्ट्राची ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखला जाणारा आंबोली धबधबा बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा मुसळधार पावसामुळे तात्पुरता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Sindhudurg: मुसळधार पावसाचा फटका! महाराष्ट्राची ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखला जाणारा आंबोली धबधबा बंद

आंबोलीतील प्रसिद्ध धबधबा सध्या पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला असून, यामागे सुरक्षेचे कारण असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे धबधब्याच्या परिसरात धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सततच्या पावसामुळे डोंगरमाथ्यावरून माती, दगड तसेच इतर अवशेष वाहून येत आहेत. अशा परिस्थितीत धबधब्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक आंबोली धबधब्याला भेट देत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून परिसरावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number