वृत्तसंस्था, मुंबई
आजकाल आल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगीक अत्याचाराच्या घटना सऱ्हास घडत असताना एक घृणास्पद करणारी बातमी समोर आली आहे. एका खासगी मराठी शाळेत दोन विद्यार्थांनी त्यांच्याच मित्रावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधून उघडकीस आला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील खासगी शाळेत हा प्रकार घडला. पीडीत विद्यार्थी आणि त्याचे दोषी मित्र हे इयत्ता नववी मध्ये शिकत आहेत.
पीडीत विद्यार्थाला त्याच्या दोन मित्रांनी स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ ही दोन विद्यार्थ्यांनी तयार केला. मित्रांच्या या लज्जास्पद कृत्याला कंटाळून फिनाल पिऊन स्वत: ला संपवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर प्रसारित झाल्याने ही बाब सामोरी आली.
दोन्ही विद्यार्थी हे पीडित विद्यार्थ्याकडून पैशांची मागणी करत होते. मागणी पूर्ण न झाल्यास हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करू अशी धमकी देखील त्यांनी पीडीत विद्यार्थ्याला दिली.
दरम्यान, त्याचं परिसरात राहणाऱ्या एका युवकाकडे पीडीत मुलाच्या लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ हाती आला. या युवकाने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात संबधित प्रकाराची माहिती दिली. सध्या ओरोपी मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पोलिस त्याबाबतची चौकशी करत आहेत.