WPL 2026: जेतेपद राखण्यासाठी अंबानींच्या टीमची नवी रणनीती; आता ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी

जेतेपदाची हॅटट्रिक साध्य करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या मुंबई इंडियन्सने प्रशिक्षकपदाची धुरा आता ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या खेळाडूकडे दिली आहे.

WPL 2026: जेतेपद राखण्यासाठी अंबानींच्या टीमची नवी रणनीती; आता ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी

WPL 2026: महिला प्रीमियर लीगच्या (WPL) नव्या हंगामासाठी गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात मोठे फेरबदल केले आहेत. जेतेपदाची हॅटट्रिक साध्य करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या मुंबई इंडियन्सने प्रशिक्षकपदाची धुरा आता ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या प्रशिक्षक लिसा काइटली यांच्याकडे सोपवली आहे. यापूर्वी ही जबाबदारी सांभाळणाऱ्या शार्लोट एडवर्ड्स यांच्या जागी आता काइटली मुंबईच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसतील.

प्रशिक्षक फळीत मोठे बदल

मुंबई इंडियन्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाचे बदल केले असले तरी, भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही मेंटॉर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका कायम ठेवणार आहे. लिसा काइटली यांच्या अनुभवाचा फायदा घेत संघ आपली कामगिरी अधिक उंचावेल, अशी मुंबई इंडियन्सला खात्री आहे.

हेही वाचा – Bangladesh Cricket Team: 'आम्ही नाही खेळणार'; बांगलादेशचा वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा इशारा; ICC ला पाठवलं दुसरं पत्र

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?  

मुंबई इंडियन्स आणि स्मृती मानधना हिचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याने या हंगामाची सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्णधार हरमनप्रीत कौरने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, 'आम्ही दडपणाखाली नसून उलट गेल्या दोन विजेतेपदांमुळे संघात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. मुंबई हे शहर माझ्यासाठी नेहमीच लकी राहिले आहे आणि यंदाही आम्ही जेतेपद राखू, असा मला पूर्ण विश्वास आहे. 

हेही वाचा – Tata Steel Chess Tournament : आर. प्रागननंदा आणि वेस्ली सो यांच्या सामन्यात मोठा वाद; 1 सेकंद बाकी असताना घड्याळ थांबवले.. आणि..

डी. वाय. पाटील स्टेडियमवर सलामीची लढत

लीगच्या पहिल्या टप्प्यातील सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. हरमनप्रीतसाठी हे मैदान आणि मुंबईचा परिसर नेहमीच स्फूर्तिदायक राहिला आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून, नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्स विजयाने सुरुवात करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number