वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बॉलिवुड इवेंट्सपासून ते रेड कार्पेट पर्यंत आपल्या लुकने सर्वांना भारावून टाकणारी ऐश्वर्या राय नुकताच मुकेश अंबानींच्या पार्टीमध्ये दिसली. अंबानींच्या पार्टीमध्ये बॉलिवुड स्टार्सच दिसण म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. मात्र अंबानींच्या या पार्टीमध्ये ऐश्वर्याच का वेगळी ठरली याची खुप चर्चा होत आहे.
अंबानींकडुन ऐश्वर्या आणि अभिषेकला एका कॅजुअल डिनर पार्टीसाठी इन्विटीशन आले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या रायने या पार्टीमध्ये घातलेल्या ड्रेसवर लाखों रुपये खर्च केले आहेत. या पार्टीसाठी ऐश्वर्या रायने पिवळ्या रंगाच्या टक्सिडो गाउनची निवड केली आहे. या गाउनची किंमत 3 लाख 70 हजार सांगितली जात आहे. या गाउन सोबत ऐश्वर्याने लुई बितोंच्या क्लच पर्सला आपली स्टाईल स्टेटमेंटमध्ये जोडले आहे.