जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स असलेल्या Amazonचे मालक जेफ बेझॉस यांचाही मोबाईल हॅक झाल्याचं वृत्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे फोन टॅपिंगचं भूत आंतरराष्ट्रीय स्तरावरही असल्याचं दिसून आलंय.
एक Whatsapp संदेश मिळाल्यानंतर बेझॉस यांचा Mobile हॅक झाला.
ज्या क्रमांकावरून बेझॉस यांना संदेश आला तो क्रमांक सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा होता, असे सांगण्यात येत आहे.
जवळपास दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1 मे 2018 रोजी हा प्रकार घडला होता.
जेफ आणि सलमान यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ पाठविण्यात आला होता.
हा व्हिडिओ म्हणजे बेझॉस यांच्या mobile मध्ये घुसखोरी करण्यासाठी विशिष्ट रचना करण्यात आलेला virus असलेली फाइल होती.
काही तासांमध्येच बेझॉस यांच्या mobile मधून बऱ्याच मोठ्य़ा प्रमाणावर माहिती चोरीला गेली, असे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.