अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

काश्मीर, ७ जुलै २०२३,प्रतिनिधी: अमरनाथ यात्रा शुक्रवारी स्थगित करण्यात आली आहे. ‘जय बाबा बर्फानी’च्या घोषात १ जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बालटालमधील पवित्र अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब […]

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

काश्मीर, ७ जुलै २०२३,प्रतिनिधी: अमरनाथ यात्रा शुक्रवारी स्थगित करण्यात आली आहे. ‘जय बाबा बर्फानी’च्या घोषात १ जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

बालटालमधील पवित्र अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हवामान पूर्ववत होईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल.

काश्मीरमधील अनेक भागात पावसामुळे शुक्रवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. शुक्रवारी कोणत्याही यात्रेकरूंना गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number