अमरातीवतीत अंधश्रद्धेचा कळस; गावकरी जपतायत 400 वर्ष जुनी परंपरा

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेचे विचित्र प्रकार समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सध्याच्या आत्यधुनिक काळातही लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर येथए अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार घडलाय. गावकऱ्यांनी 400 वर्षांची परंपरा जपत रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण घातले.     या लोटांगणामुळे आयुर्वेदिक उपचार होत असल्याचा समज स्थानिक भाविकांमध्ये […]

अमरातीवतीत अंधश्रद्धेचा कळस; गावकरी जपतायत 400 वर्ष जुनी परंपरा

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेचे विचित्र प्रकार समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सध्याच्या आत्यधुनिक काळातही लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर येथए अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार घडलाय. गावकऱ्यांनी 400 वर्षांची परंपरा जपत रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण घातले.

amravati.png

 

 

या लोटांगणामुळे आयुर्वेदिक उपचार होत असल्याचा समज स्थानिक भाविकांमध्ये आहे. त्यामुळं परंपरेच्या नावाखाली हा अंधश्रद्धेचा थरार पाहण्यासाठी शेकडो भक्त जमा होतात. या लोटांगणात लहान, मोठे, अबालवृध्द भाग घेतात. हे लोटांगण म्हणजे आयुर्वेदिक उपचाराचा एक भाग समजला जातो. अमरावती जिल्ह्याच्या बाहेरुनही अनेक भाविक या परंपरेत सहभागी होतात.

वडनेर गंगाई येथे संत झगेश्वर महाराज यांच्या यात्रेला सध्या प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या यात्रेत महाराजांच्या मंदिरात रिंगणीच्या काटयांवर लोटांगण घालण्याचा हा प्रकार चालतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number