राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार कोणी केला? -हितेंद्र ठाकूर

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि मित्र पक्षांच्या मतदानावर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे मतदान गुप्त असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी घोडेबाजारावर […]

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार कोणी केला? -हितेंद्र ठाकूर

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि मित्र पक्षांच्या मतदानावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे मतदान गुप्त असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी घोडेबाजारावर भाष्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार कोणी केला? असा सवाल उपस्थित करत घोडेबाजार कोणी केला असेल तर स्पष्ट सांगावे, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

विधानपरिषदेसाठी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि राजेश पाटील यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. हितेंद्र ठाकूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विरारहून रवाना झाले आहेत. तर, क्षितिज ठाकूर अमेरिकेतून लगबगीने मतदानासाठी विधानभवनात पोहचले आहेत. दरम्यान, बविआच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्या चुरशीची लढत होणार आहे. भाई जगताप यांना विजयी होण्यासाठी केवळ ८ मतांची आवश्यकता आहे. तसेच प्रसाद लाड यांना १२ मते कमी पडत आहेत. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून २९ आमदार आहेत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतदानाकडे भाजप आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number