वैयक्तिक वादावर आलियाचे सिद्दीकीचे वक्तव्य

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सतत त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि सिनेमांसाठी चर्चेत असतो. मात्र अलीकडे तो त्याच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत होता. त्या घटनेनंतर सध्या तो आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी विभक्तपणे राहत आहेत.सोशल मीडियावर त्यांचा हा कलह पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत. अशातच एका नव्या मुलाखतीत आलिया सिद्दीकीने आपण घरगुती कलह जगासमोर का आणले याचे कारण […]

वैयक्तिक वादावर आलियाचे सिद्दीकीचे वक्तव्य

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सतत त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि सिनेमांसाठी चर्चेत असतो. मात्र अलीकडे तो त्याच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत होता. त्या घटनेनंतर सध्या तो आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी विभक्तपणे राहत आहेत.सोशल मीडियावर त्यांचा हा कलह पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत. अशातच एका नव्या मुलाखतीत आलिया सिद्दीकीने आपण घरगुती कलह जगासमोर का आणले याचे कारण सांगितले.

काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वाद जगासमोर आणून नवाजचे पूर्व कुटुंब कुटुंब चर्चेचा विषय बनले होते.दरम्यान आलियाने आपला कौटुंबिक वाद जगासमोर का आणला हे एका मुलाखतीत सांगितले. यावेळी ती म्हणाली,”तिने हे सर्व केले कारण तिला खूप त्रास होत होता. तिची खूप घुसमट होत असल्यामुळे या विषयावर बोलणे आवश्यक होते.”

आलिया पुढेj म्हणाली की,” मी कौटुंबिक वाद असा सार्वजनिकपणे मांडणे चुकीचे आहे असेच मला अजूनही वाटते. मात्र मी मानसिक तणावातून जात असल्याने मला तेव्हा बोलावे लागले. आणखी एका मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही खूप अडचणीत अडकता त्यावेळेला तुम्हाला माध्यमांचा आधार हा घ्यावाच लागतो. कारण त्यावेळी तुमचे ऐकणारे कोणी नसते आणि जेव्हा कोणूच तुमचे ऐकत नाही तेव्हा तेव्हा तुम्हाला आवाज उठवावा लागतो..”आता न्यायालयाने दोन्ही मुलांना शिक्षणासाठी दुबईला पाठवण्याचे निर्देश दिल्यानंतर तिला आता दिलासा मिळाला आहे असं ही ती म्हणाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number