Alia Bhatt: आलिया भट्टची राजकारणात एन्ट्री? अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आलिया भट्टने देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण आलं.

Alia Bhatt: आलिया भट्टची राजकारणात एन्ट्री? अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा फोटो शेअर झाल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना वेग आला. मात्र या फोटोमागचं कारण राजकारणाशी नव्हे, तर बॉलिवूड आणि जागतिक संगीत व्यवसायाशी थेट जोडलेलं असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

आलिया भट्टने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमुळे चाहत्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. काहींनी हा फोटो आगामी महापालिका निवडणुकांशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी बॉलिवूडमधील एखाद्या मोठ्या कराराची शक्यता वर्तवली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणावरून पडदा उठवला.

jm

खरं तर हा सगळा प्रकार बॉलिवूडमधील एक ऐतिहासिक आणि मोठा व्यावसायिक टप्पा गाठल्याशी संबंधित आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची ‘एक्सेल एंटरटेन्मेंट’ ही नामांकित प्रॉडक्शन आणि म्युझिक कंपनी आता जागतिक स्तरावर मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. जगातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी असलेल्या ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ने (UMG) एक्सेल एंटरटेन्मेंटमध्ये तब्बल ३० टक्के भागीदारी विकत घेतली आहे.

या करारामुळे एक्सेल एंटरटेन्मेंटचं एकूण बाजारमूल्य सुमारे २४०० कोटी रुपयांवर पोहोचलं असून, हा व्यवहार बॉलिवूड आणि भारतीय संगीत उद्योगासाठी मैलाचा दगड मानला जात आहे. मुंबईत सोमवारी एका भव्य सोहळ्यात या डीलची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तसेच चित्रपट, संगीत आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

या करारानुसार, युनिव्हर्सल म्युझिक इंडिया आता एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत केवळ संगीत क्षेत्रातच नव्हे, तर चित्रपट, वेब सिरीज आणि इतर नव्या कंटेंट फॉरमॅट्समध्येही धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार आहे. विशेष म्हणजे, एक्सेलच्या आगामी प्रोजेक्ट्सचं संगीत आता थेट जागतिक स्तरावर युनिव्हर्सल म्युझिकच्या माध्यमातून पोहोचणार आहे.

याशिवाय, दोन्ही कंपन्या मिळून एक स्वतंत्र ‘एक्सेल म्युझिक लेबल’ सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय मंच मिळण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे. याच ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्यामुळेच आलिया भट्टने देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत या यशस्वी टप्प्याबद्दल अप्रत्यक्षपणे अभिनंदन केल्याचं बोललं जात आहे.

राजकारण, बॉलिवूड आणि ग्लोबल बिझनेस यांचा अनोखा संगम असलेल्या या घडामोडीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असून, भारतीय मनोरंजन उद्योगासाठी हा करार नवा अध्याय ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number