अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा टीझर लॉंच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबईअभिनेता अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचा टीझर अखेर सोमवारी लॉंच झाला. अक्षयने त्याच्या या चित्रपटात आत्तापर्यंतची न साकारलेली भूमीका केली आहे. 1948 मध्ये भारत स्वतंत्र्य झाला होता. स्वतंत्र्य भारताचं पहिलंवहील ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकीपटूची भूमिका अक्षयने साकारली आहे. या सिनेमात अक्षयने बंगाली हॉकीप्लेयरची भूमीका साकारली आहे ज्याचं स्वप्न इंडीयासाठी गोल्ड मॅडल जिंकायचं […]

अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटाचा टीझर लॉंच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेता अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचा टीझर अखेर सोमवारी लॉंच झाला. अक्षयने त्याच्या या चित्रपटात आत्तापर्यंतची न साकारलेली भूमीका केली आहे. 1948 मध्ये भारत स्वतंत्र्य झाला होता. स्वतंत्र्य भारताचं पहिलंवहील ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकीपटूची भूमिका अक्षयने साकारली आहे. या सिनेमात अक्षयने बंगाली हॉकीप्लेयरची भूमीका साकारली आहे ज्याचं स्वप्न इंडीयासाठी गोल्ड मॅडल जिंकायचं असतं.

‘अभी तक इंडिया चूप था, अब हम बोलेगा और दुनिया सुनेगा’ अशी टॅगलाईन देत अक्षयने हा विडीओ त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला.

टीझरची सुरुवातचं ‘हम एक पागल बंगाली है, हम हॉकी से प्यार करता है’ या संवादाने होत आहे. 1946 चा काळ सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली भारताने तीन गोल्ड जिंकले. मात्र, तिरंग्यासाठी पहिला गोल्ड जिंकण्यासाठी अक्षयकुमारची व्यक्तिरेखा इतरांना या विडीओतून प्रोत्साहन देते. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिमा काग्तीने यानी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

छोट्यापडद्यावरील बहुचर्चीत ‘नागीन’ फेम मौनी रॉय गोल्ड चित्रपटाताच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पहिल्यादाचं दिसणार आहे. मौनी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. याशिवाय अमित साध, कुणाल कपूर, फरहान अख्तर हे देखील मुख्य भूमिकेत दिलणार आहेत. डिसेंबर महिन्यात गोल्डचं शूटिंग पूर्ण झालं असून आता त्याचा टिझर देखील प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. तर, अक्षयची मुख्य भूमिका असलेला पॅडमॅन येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number