जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अक्षयने त्याच्या आगामी सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. अक्षयचा ‘गोल्ड’ हा सिनेमा पुढच्या वर्षी 15 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होणार आहे.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने आतापर्यत अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट देत त्याने 100 करोडची कमाई केली आहे.
टॉयलेट एक प्रेमकथा, रुस्तम, एअरलिफ्ट, फिर हेरा फेरी, वेलकम, हाऊसफुल, धडकन, खिलाडीओं का खिलाडी, स्पेशल 26 यासारख्या विविध धाटणीचे चित्रपट करत त्याने अनेक प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.