Akola Heatwave: राज्यात उष्माघाताचा आणखी एक बळी? अकोल्यात ऑटोमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अकोल्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला.

Akola Heatwave: राज्यात उष्माघाताचा आणखी एक बळी? अकोल्यात ऑटोमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

 

अकोला शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा मारहाणीचे चिन्ह आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाणार आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका वाढत असून, सलग चार दिवस तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. 14 एप्रिल रोजी अकोल्यात तब्बल 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे जागतिक स्तरावरही उच्चांक मानले जात आहे.गेल्या काही दिवसांतील तापमानाचा आढावा घेतल्यास, 13 एप्रिल रोजी 43.8 अंश, 12 एप्रिल रोजी 43.1 अंश, 11 एप्रिल रोजी 42.1 अंश, तर 10 एप्रिल रोजी 40.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. या सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलका आहार घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. अकोल्यात उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला का, याबाबत वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number