Viral Video : खाकी वर्दीला काळिमा; महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी, पोलीस उपनिरीक्षकाचा किळसवाणा प्रताप, व्हिडीओ पाहून नागरिकांचा संताप

अकोल्यात पोलीस कोठडीत असलेल्या महिलेकडे अश्लील मागणी केल्याचा आरोप उपनिरीक्षकावर करण्यात आला आहे.

Viral Video : खाकी वर्दीला काळिमा; महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी, पोलीस उपनिरीक्षकाचा किळसवाणा प्रताप, व्हिडीओ पाहून नागरिकांचा संताप

अकोला: राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप पोलीस उपनिरीक्षकावर करण्यात आला असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस परिसरात ही घटना घडली. राजेश जाधव असे संबंधित उपनिरीक्षकाचे नाव असून त्याने कोठडीत असलेल्या महिलेकडे अत्यंत अश्लील आणि अमानवी मागणी केल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, उपनिरीक्षक जाधव याने महिलेला “10 हजार रुपये देतो, तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव” अशी किळसवाणी मागणी केली. संबंधित महिला ही 80 लाखांच्या अपहार प्रकरणात पोलीस कोठडीत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Paternity Leave: ‘बालसंगोपन ही केवळ आईची जबाबदारी नाही’; राघव चढ्ढा यांनी संसदेत केली ‘ही’ मोठी मागणी

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने दखल

ही बाब समोर आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुंबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित महिलेचा जबाब ऐकून घेतला.

या प्रकारामुळे संताप व्यक्त करत जुंबळे यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. या घटनेनंतर उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

चौकशी सुरू; संतापाची लाट

सध्या पीडित महिलेचा अधिकृत जबाब नोंदवण्यात येत असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खाकी वर्दीवर काळा डाग लागल्याची भावना व्यक्त होत असून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

हेही वाचा: Anil Desai: ‘मी गुन्हेगार नाही, CCTV फुटेज जाहीर करा…’; सातारा ZP राडाप्रकरणात अनिल देसाईंची मोठी मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number