Homeमहाराष्ट्र साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही...
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक होणार नाही, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने निर्णय घेतला आहे. नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. तसेच 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी वर्धा व यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली. मात्र, यांपैकी एकाच ठिकाणी हे संमेलन पार पडणार आहे. याची अधिकृत घोषणा […]
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक होणार नाही, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने निर्णय घेतला आहे. नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
तसेच 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी वर्धा व यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली. मात्र, यांपैकी एकाच ठिकाणी हे संमेलन पार पडणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी आशा आहे.
प्रचलित निवडणुक प्रक्रियेमुळे साहित्य संमेलनात अनेक चांगल्या साहित्यिकांना अध्यक्ष होण्यापासून वंचित रहावे लागते
त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चांगले अध्यक्ष लाभत नसल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला
सध्याची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रद्द करुन त्याऐवजी सर्वसमंतीने अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले
त्यासाठी साहित्य महामंडळाच्या घटनेतही दुरुस्ती करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.
त्यामुळे प्रत्येक साहित्य संमेलनात होणारे वाद बंद होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.