वित्त विभागाचा कारभार सांभाळताच अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या बाबत कृपाळू धोरण अवलंबले आहे .गेल्या १५ ते २० दिवसआगोदर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणते खाते द्यावे आणि काही अकार्यक्षम मंत्र्यांना वगळावे याचा विचारविनिमय झाला. सर्व खाती वाटप निश्चिती झाल्यांनंतरही अर्थखात कोणाला देणार या प्रश्नामुळे देखील २ दिवस खातेवाटप लांबणीवर पडलं होत.
अजित पवारांना अर्थखाते देण्यासाठी काही नेत्यांचा विरोध होता, वित्त विभागाचा कारभार सांभाळताच अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या बाबत कृपाळू धोरण अवलंबले आहे . अजित पवार यांनी विकास निधीचे वाटप करण्यासाठी हात सैल सोडला आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मतदार संघ विकास निधीसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अजित पवार समर्थक आमदारांना यातील महत्त्वपूर्ण वाटा जाणारा असून त्यातील उरलेला भाग शिंदे समर्थक आणि भाजप आमदारांना मिळेल अशी अपेक्षा आहे.