जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली. कारण अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीकडून घोटळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रं मागवली आहेत.
विशेष म्हणजे, याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती.
अजित पवारांचा यामध्ये भूमिका काय आहेत, हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून ईडीनं कागदपत्रं मागवली आहेत. आता याप्रकरणी अंमलबजाबणी संचालयनालयानं एसीबीकडे घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं मागवली असून, अजित पवारांची चौकशी होण्याचे संकेत मिळत आहेत.