शिवसेनेची टीका म्हणजे ‘विनाशकालीन विपरीत बुद्धी’- अजित पवार

“मी खरं बोललो तर शिवसेनेच्या नेत्यांना कोल्हापूरी मिरच्या का झोंबल्या?” असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारलाय. सामना मधुन आग्रलेखाच्या माध्यमातून केलेल्या टिकेवर उत्तर देताना अजितदादा पवार यानी शहरी भागातील लोकांना कळण्यासाठी वडील काढला आणि ग्रामीण भागातील लोकांना कळण्याकरतीला बाप काढला यात काय चुकलं? असंही स्पष्ट केलंय. सामना पेपर कोणी जास्त वाचत नाही. कारण […]

शिवसेनेची टीका म्हणजे ‘विनाशकालीन विपरीत बुद्धी’- अजित पवार

“मी खरं बोललो तर शिवसेनेच्या नेत्यांना कोल्हापूरी मिरच्या का झोंबल्या?” असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारलाय. सामना मधुन आग्रलेखाच्या माध्यमातून केलेल्या टिकेवर उत्तर देताना अजितदादा पवार यानी शहरी भागातील लोकांना कळण्यासाठी वडील काढला आणि ग्रामीण भागातील लोकांना कळण्याकरतीला बाप काढला यात काय चुकलं? असंही स्पष्ट केलंय.

सामना पेपर कोणी जास्त वाचत नाही. कारण तो पेपर शिवसेनेचा मुखपत्र आहे. पण एखाद्या वृत्तपत्रातील अग्रलेखात अशी भाषा वापरणे सुसंस्कृतपणा नसल्याचं लक्षण असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

‘अजित पवार हे शरद पवार यांच्यामुळे आहेत’ या सामनातील टिकेवर उत्तर देताना अजित पवार यांनी शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच अस्तित्वात असल्याचे विधान केलंय.

शिवसेनेची अशा पद्धतीची टीका म्हणजे ‘विनाशकालीन विपरीत बुद्धी’ म्हणावी लागेल. त्याचबरोबर ‘कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत’ असं अजित पवार यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number