अजित पवारांनी चिकटवले ‘वादग्रस्त’ स्टिकर्स

   अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात वाहनांना ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नावाचे स्टिकर्स चिकटवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ अशा आशयाचे स्टिकर्स वाटले आहेत. हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही […]

अजित पवारांनी चिकटवले ‘वादग्रस्त’ स्टिकर्स

   अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात वाहनांना ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नावाचे स्टिकर्स चिकटवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ अशा आशयाचे स्टिकर्स वाटले आहेत.
हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते असे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील विविध मराठा संघटना व भाजप सरकार आक्रमक झाले होते, त्यानंतरही अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी अजित पवार पुण्यात गेल्यावर पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांचे ढोल- ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून नंतर ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशयाचे स्टिकर्स दुचाकींना लावले. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर हे स्टिकर्स लावण्यात आले तसेच सामान्य नागरिकांनाही हे स्टिकर्स वाटण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number