जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसनेने मंगळवारी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.
ही शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांची राहिलेली नाही. शिवसेनेचा आमदार भाजपाच्या व्यासपीठावर जाऊन काम करतोय, असं चित्र पाहायला मिळतंय.
बाळासाहेबांच्या काळात असं कधी झालं नव्हतं अशी टीका अजित पवारांनी केली.