जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय चुकीचा आणि लोकशाहीला घातक आहे. हे उद्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेतून निवडतील, असं म्हणत राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
सरकारने हेकेखोर वृत्ती सोडावी. अशा निर्णयाने विकास अडचणीत येईल. त्यामुळे निर्णयाबाबत फेरविचार करण्याची विनंती करु.
हे सरकार लोकशाहीचा खून करण्याचं काम करत आहे, अशा शब्दात अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.