जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एकिकडे सरकार शेतकऱ्यांच्या मनातील प्रक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, विरोधकांचा विरोध मात्र काही केल्या कमी होत नाही.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कर्ज माफीवरील नितीन गडकरींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची भाषा आज सत्तेत आल्यावर बदलली. कर्जमाफी हा योग्य पर्याय नाही असं जर नितीन गडकरी म्हणत असतील,
तर, उत्तर प्रदेशात कर्जमाफी का करण्यात आली असा प्रश्न अजित पवारांनी विचारला.
कर्ज माफीसाठी हिच योग्य वेळ असल्याचही ते म्हणालेत. रोहामध्ये नगरपालिकेच्या विकास कामांच्या भूमी पूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.