जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधीमंडळाचं अधिवेशन गाजताना दिसत आहे. विरोधकांसोबत शिवसेनाही कर्जमुक्तीची मागणी करत आहे. याच शिवसेनेला अजित पवारांनी मात्र वेगळीच ऑफर दिली.
तुम्ही आम्ही एकत्र येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी ऑफरच अजितदादांनी शिवसेनेला दिली. तुम्ही 62 तर आम्ही 80 ते 82.. 145 मॅजिक फिगर झाली की एकत्र येऊन ठराव मंजूर करु.
एकदाचं काय ते होऊन जाऊ दे अशी ऑफरच अजितदादांनी शिवसेनेला दिली. त्यामुळे राजकीय वर्तृळात मात्र खळबळ उडाली. सत्तेत असूनही विरोधात राहणारी शिवसेना विरोधकांसोबत हातमिळवणी करणार का हाच प्रश्न निर्माण होत आहे.