‘अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे’

कराड, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते. रविवारी अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय घडामोडींना […]

‘अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे’

कराड, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते. रविवारी अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास ४० आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. शरद पवार येत्या काही दिवसात राज्यभरात दौरा करणार आहेत. तर सातारा दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांचे नाव घेऊन अजित पवार म्हणजे पक्ष नाहीत असं शरद पवार म्हणाले आहेत.

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की,
अजित पवार कोणी परके नव्हते, माझी मुलगी तीनदा तिथे गेली, त्यांनी काही चुकीचं काम केलं असं नाही. शेवटी एकच तर काम केलं आहे, मतभिन्नता आहे. ही मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकाऱ्याने केला म्हणुन त्यावर संशय मी कधी व्यक्त करणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. तर अजित पवार म्हणजे पक्ष नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. दोन तीन महिन्यात महाराष्ट्राचं राष्ट्रवादीसाठी चांगलं चित्र दिसेल असंही पवार यावेळी म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number