जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी हायकोर्टाला दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जिगाव प्रकल्पाचे कंत्राट बाजोरिया कंस्ट्रक्शन्स कंपनीला मिळवून देण्यात अजित पवार यांची काय भूमिका होती यावर राज्य सरकार सविस्तर शपथपत्र सादर करेल असेही यावेळी कोर्टाला सांगण्यात आले.
जिगाव प्रकल्पावरील खर्च 394 कोटीवरून आता 5700 कोटी एवढा झाला आहे. यासंदर्भात अतुल जगताप यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. एसीबीच्या अमरावती युनिटकडून यासंदर्भात तपास सुरु आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुठल्याही दोषींना दया दाखवली जाणार नाही आणि कुठलाही दबावात कारवाई केली जाणार नाही असेही मुख्य सचिव सुमित मलिक यांनी हायकोर्टाला सांगितले आहे.