अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्या?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरून राज्यात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. 35 ते 40 आमदारांसह अजित पवार हे भाजपसोबत जाणार, पवारांनी अमित शहांची भेट घेतली, जागावाटपही ठरल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांचा बाजार गरम झाला आहे. या चर्चांवर अजित पवारांनी स्वतः खुलासा करण्याची मागणी ठाकरे गट आणि कॉंग्रेसकडून करण्यात आली. तर शरद पवारांच्या मूक […]

अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्या?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरून राज्यात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. 35 ते 40 आमदारांसह अजित पवार हे भाजपसोबत जाणार, पवारांनी अमित शहांची भेट घेतली, जागावाटपही ठरल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांचा बाजार गरम झाला आहे. या चर्चांवर अजित पवारांनी स्वतः खुलासा करण्याची मागणी ठाकरे गट आणि कॉंग्रेसकडून करण्यात आली. तर शरद पवारांच्या मूक संमतीनेच ही फूट पडणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यातच येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी चर्चेत आगीचा भडका उडविला आहे. त्याचप्रमाणे 18एप्रिल अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढची खेळी काय असणार हे पाहण्यासारखे आहे.

अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिल्यांनतर खळबळ उडाली होती. आता तर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे ५३ पैकी ४० आमदार असून त्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्याचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या सह्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल. विशेष म्हणजे या आमदारांमध्ये शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही अजित पवारांच्या सोबत आहेत असाही दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र अजूनही या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. अजित राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावत असताना, मोठ्या पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अखेरच्या क्षणी शरद पवार यामध्ये हस्तक्षेप करून पारडं फिरवू शकतात. परंतु, शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही अजित पवारांच्या सत्ताबदलाला पाठिंबा देत आहेत, असा दावाही इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number