“सरकारची अवस्था म्हणजे मला नाही आब्रू, तर मी कशाला घाबरू?”

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात सभा घेण्यास सुरवात केली आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी ‘मला नाही आब्रू, तर मी कशाला घाबरु’ अशी या सरकारची अवस्था असल्याची टिका केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर […]

“सरकारची अवस्था म्हणजे मला नाही आब्रू, तर मी कशाला घाबरू?”

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात सभा घेण्यास सुरवात केली आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी मला नाही आब्रू, तर मी कशाला घाबरु अशी या सरकारची अवस्था असल्याची टिका केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. मेळाव्यांसोबतच जेवणावळींचाही घाट घातला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचा लोकार्पण सोहळा आणि जलपूजन करत शेतकरीमेळावा घेतला. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली आहे.

 

राम नव्हे रावण कदम कदमवर टीका-

 

भाजप आमदार महिलांविषयी अपशब्द वापरतात. हा राम कदम नव्हे रावण कदम आहे. यांच्या एका आमदाराने यापूर्वी यापेक्षा वाईट शब्द उच्चारला होता. यांच्या आमदारांना याचसाठी निवडून दिलंय का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

 

10 सप्टेंबरपासून आंदोलन

 

पेट्रोल- डिझेल सर्वाधिक महागड्या दरात केवळ महाराष्ट्रातच मिळतंय. गेल्या चार वर्षांत 12 लाख कोटी रुपये पेट्रोलच्या रूपातून काढून घेतले आहेत. याविरोधात दहा सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येणार आहे.

 

मोदींना संसारच नाही, गॅस सिलेंडरचा भाव कसा कळणार?”

 

आज लोक या बाबत काही बोलत नाहीत. जर बोललं तर तडीपारीपासून ते नक्षलवादी ठरवण्यापर्यंतचे गुन्हे दाखल केले जात आहेत. देशात सगळ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र मोदींना संसारच नाही त्यामुळे त्यांना गॅस सिलेंडरचा भाव कसा कळणार, असा टोलाही पवारांनी लगावलाय.

योगाने प्रश्न सुटत नाहीत

रुपयाचं अवमुल्यन होतंय. मात्र त्यावर बोलत नाही. यांचं मात्र योगा करा आणि झाडलोट करा असं काम चाललंय. हे चांगलं असलं तरी, त्याने प्रश्न सुटत नाहीत. आम्हीपण कामं केली पण जाहिरातबाजी केली नाही.

फडणवीसांवर 302 नुसार गुन्हा दाखल करायचा का?”

राज्यात पाच महिन्यांत 1092 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हेच का अच्छे दिन? आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलम 302  नुसार गुन्हा दाखल करायचा का?” असा सवालही अजित पवारांनी केला.

 

एकूणच अजित पवारांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सरकारची अवस्था म्हणजेमला नाही आब्रू, तर मी कशाला घाबरू?”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number