अजितदादांचे धनंजय मुंडेसह “ले बेटा सेल्फी ले ले रे”

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही राज्यातील खड्डे हे आजही कायमच आहेत. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने  मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या अजित दादा पवार यांनाही या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागला. एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजित दादांनी चक्क खड्ड्यासोबत सेल्फी […]

अजितदादांचे धनंजय मुंडेसह “ले बेटा सेल्फी ले ले रे”

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही राज्यातील खड्डे हे आजही कायमच आहेत.

हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने  मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या अजित दादा पवार यांनाही या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागला. एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजित दादांनी चक्क खड्ड्यासोबत सेल्फी काढून चंद्रकांत दादांना पाठवलाय.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुडें यांना ‘तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन चंद्रकांत दादांना पाठव रे बाबा ‘असं म्हणत सेल्फीत भाग घेत आपली नाराजी व्यक्त केलीये.

धनंजय आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचे काय हाल होत असतील? मला काही ते सेल्फी बेल्फी  जमत नाही.

तूच या खड्ड्यांचा सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा असे सांगितले.  सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या मुंडे यांनी मग तात्काळ आपल्या फोन मधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटर वर पाठवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number