ऐश्वर्याला आठवलं नंदिनी पात्र

मुंबई,२६ एप्रिल २०२३,प्रतिनिधी:अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी नावाचं पात्र साकारत आहे. ऐश्वर्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या व्यस्त आहे. ऐश्वर्याने याआधी पोन्नियिन आणि हम दिल दे चुके सनम या दोन चित्रपटातदेखील नंदीनी पात्र साकारलं होतं. दरम्यान, प्रमोशनदरम्यान ऐश्वर्याला नंदिनी या पात्राविषयी प्रश्न विचारण्यात आले. […]

ऐश्वर्याला आठवलं नंदिनी पात्र

मुंबई,२६ एप्रिल २०२३,प्रतिनिधी:अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी नावाचं पात्र साकारत आहे. ऐश्वर्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या व्यस्त आहे. ऐश्वर्याने याआधी पोन्नियिन आणि हम दिल दे चुके सनम या दोन चित्रपटातदेखील नंदीनी पात्र साकारलं होतं. दरम्यान, प्रमोशनदरम्यान ऐश्वर्याला नंदिनी या पात्राविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ऐश्वर्या नंदिनी पात्राची आठवण आली.ऐश्वर्या म्हणाली, ‘हा खरच योगायोग आहे.

‘हम दिल दे चुके सनम’मधील नंदिनी व्यक्तीरेखा माझ्या खूप जवळची आणि खास आहे. नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. माझ्यासाठी संजय लीला भन्साली आणि प्रेक्षकांसाठी नेहमीच खास बनले आहे. तसेच, पीएसमध्येदेखील नंदिनीची भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव झाला. तसेच चित्रपटातील रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.’, असे ऐश्वर्या म्हणाली.

विशेष म्हणजे हम दिल दे चूके सनम या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, एर्श्वर्या राय आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रकरणची चर्चा झाली होती.दरम्यान, पोन्नियिन सेल्वन २ या चित्रपटात एश्वर्या राय नंदीनीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेता जयम रवीने अरुलमोझिवर्मनची भूमिका साकारली आहे. तसेच विक्रम, कार्ती आणि त्रिशा हे कलाकार देखील विविध भूमिकेत झळकणार आहेत. ‘पोन्नियन सेल्वन 2’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटात ऐश्वर्या,त्रिशा, प्रकाश राज लक्ष्मी, शोभिता धुलीपाला, जयराम, प्रभू, लाल कलाकार झळकणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number